६५ हून अधिक शाळा-महाविद्यालयांत ‘सुरक्षित बचपण अभियान’द्वारे बालहक्कांबाबत जनजागृती

६५ हून अधिक शाळा-महाविद्यालयांत ‘सुरक्षित बचपण अभियान’द्वारे बालहक्कांबाबत जनजागृती
Published on: 
शाळा महाविद्यालयांत बालहक्कांबाबत जनजागृती ----------------- परभणी, हिंगोली जिल्ह्यात सुरक्षित बचपण अभियान सकाळ वृत्तसेवा परभणी, ता.५ ः राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार राज्यभरात ‘सुरक्षित बचपण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ६५ हून अधिक शाळा, महाविद्यालये, वसतिगृहांत विद्यार्थ्यांसाठी बालहक्क व बालसंरक्षणाबाबत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. एम. सादराणी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ‘गुड टच-बॅड टच’, बालकांचे स्वसंरक्षण, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा), बालसंरक्षणासाठी जिल्हास्तरावर कार्यरत विविध यंत्रणा व सेवांची माहिती देण्यात आली. बालकांनी कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराला बळी पडू नये. अशा प्रसंगी धैर्याने प्रतिकार करण्यासोबतच पालक, शिक्षक, संबंधित यंत्रणांची मदत घ्यावी असे आवाहन करण्यात आले. बालकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे, बालकांवरील अत्याचारांना प्रतिबंध घालणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. बालसंरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाचे सामूहिक कर्तव्य आहे. प्रत्येक बालकास सुरक्षित, आनंदी, भयमुक्त बालपण मिळावे यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे असेही या अभियानातून अधोरेखित करण्यात आले. बालकांना अडचण किंवा संकटाचा सामना करावा लागल्यास चाइल्ड हेल्पलाइन १०९८, महिला हेल्पलाइन १८१, पोलिस हेल्पलाइन ११२, कायदेविषयक मदतीसाठी १५१०० या हेल्पलाइन क्रमांकांचा उपयोग करावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) भूषण म. काळे यांनी केले. .....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.