
फुलंब्री : तालुक्यातील चौकावाडी (ता.जि. छत्रपती संभाजीनगर) येथील विवाहितेचा पैशांसाठी छळ करून असह्य वेदना देत घरात डांबून एक-दोन नव्हे; तर तब्बल १७ चटके इलेक्ट्रिक शोल्डरचे दिले. याप्रकरणी हीना शेख यांच्या फिर्यादीवरून सासू-सासरे, पती, दीर आणि दोन नणंदा अशा सहा जणांविरुद्ध रविवारी (ता. एक) फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.