esakal | पर्यटननगरी औरंगाबादला खड्ड्यांचे ग्रहण, पर्यटक येणार कुठून?
sakal

बोलून बातमी शोधा

Potholes In Aurangabad

औरंगाबाद पर्यटननगरी. प्रसिद्ध दख्खनचे ताज ज्याला म्हटले जाते असे बिबी का मकबरा या शहरात आहे. तसेच अनेक पर्यटनस्थळे आहेत. मात्र येथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

पर्यटननगरी औरंगाबादला खड्ड्यांचे ग्रहण, पर्यटक येणार कुठून?

sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात यंदा जोरदार पाऊस झाला आहे. काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसानेही औरंगाबादकरांना झोडपलं. यामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. पर्यटननगरीला हे नेहमीचेच अनुभव पाठीशी आहेत. सर्वांच्या आकर्षणाचे ठिकाण असलेल्या कॅनॉट प्लेसमध्येही खड्ड्यांची व्यापारी व ग्राहकांना सवय झाली आहे.

महानगरपालिका कोरोना संसर्ग रोखण्यात व्यस्त आहे. दुसरीकडे शहरातील पायाभूत सुविधांचे कामे थांबवणे परवडणारे नाही. काही ठिकाणी सिमेंटच्या रस्त्यांची कामे चालू आहेत. त्यामुळे नक्कीच शहरवासीयांना फायदे मिळेल. पण या रस्त्यांवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होणार कुठे? सर्वच पेव्हर ब्लॉक व काँक्रिटीकरण होत असेल तर शहरात जोरदार पाऊस झाला तर सगळीकडे पाणीच पाणी साचेल. याचा औरंगाबाद महानगरपालिकेने विचार करायला हवा.
सध्या कोरोनामुळे शहर बससेवा बंद आहे.

औरंगाबादच्या पाणी पुरवठ्याचे तीन तेरा, वेळ इतकी वाईट की, वीज बिलाचा खर्चही निघेना! 

त्यामुळे शहरातील नागरिक रिक्षाचा मोठ्या प्रमाणावर प्रवासासाठी वापर करतात. यावेळी त्यांना खड्ड्यांमधून जावे लागते. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या औरंगपुरातील रस्त्यांची दुरवस्था पाहवत नाही. जनतेची कामे करण्यासाठी व त्यांच दररोजच आयुष्य सुखकर व्हावे यासाठी आवाज उठवणारे गायबचं झाले की काय असा मोठा प्रश्‍न पडवा. तरीही येथील रहिवाशी विनातक्रार आपल्या रोजीरोटीसाठी घराबाहेर पडून काम करतात.

मात्र शहरातील लोकप्रतिनिधी गप्प आणि आत्मिक समाधानात आहेत. पाऊस आला की शहरातील रस्त्यांवर खड्डे पडतात. यातून हे सिद्ध होते, की काम चलाऊ वृत्तीने रस्त्यांची कामे केली जातात. ती किती सुमार असतात हे प्रत्येक वेळी पाऊस लोकांना सांगत असतो. वाहन चालकांनाही खड्डे लवकर बुजावीत अस वाटत नाही. कारण हे ‘रोजच मढ त्याला कोण रड’ अशी एकूण स्थिती झाली आहे. या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होते. तसेच वाहनधारकांना पाठी व मणक्याचा त्रास जो होतो तो वेगळाच. त्यासाठी आरोग्याचा खर्च कोण करणार आहे? खड्ड्यांमधून आदळत-आपटत प्रवास करण्यासाठी पर्यटक येतील का?

loading image
go to top