कोजागरी पौर्णिमेनिमित्त वाहतूक मार्गात बदल

कोजागरी पौर्णिमेनिमित्त वाहतूक मार्गात बदल
Published on: 
कोजागरी पौर्णिमेनिमित्त वाहतूक मार्गात बदल ---- पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन -- सकाळ वृत्तसेवा ः धाराशिव, ता. २२ ः श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजापुरात येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने गुरुवारी (ता. २२) रात्री बारापासून सोमवारी (ता. २६) रात्री बारापर्यंत तुळजापूर शहर व परिसरातील प्रमुख मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणातून सुमारे सात ते आठ लाख भाविक पायी चालत तुळजापूरकडे येतात. रस्त्यांवर होणारी प्रचंड गर्दी आणि भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता, जिल्हादंडाधिकारी कीर्तिकिरण पुजार व पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी आदेश जारी केले आहेत. हे वाहतूक प्रतिबंध पोलिस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, इतर अत्यावश्यक सेवा आणि महामंडळाच्या बसला लागू राहणार नाहीत. प्रवाशांनी आणि वाहनचालकांनी प्रशासनाला सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ---- बंदी असलेले प्रमुख मार्ग - धाराशिव-हैदराबाद : धाराशिव ते तुळजापूर-नळदुर्गमार्गे उमरगा - धाराशिव-सोलापूर : धाराशिव ते तुळजापूर-तामलवाडीमार्गे सोलापूर - छत्रपती संभाजीनगर-सोलापूर : येरमाळा ते धाराशिव-तुळजापूर-तामलवाडीमार्गे सोलापूर - लातूर-सोलापूर : औसा ते तुळजापूर-तामलवाडीमार्गे सोलापूर - तुळजापूर-बार्शी : तुळजापूर ते ढेकरी-गौडगावमार्गे बार्शी ---- पर्यायी वाहतूक मार्ग - धाराशिव ते हैदराबाद : धाराशिव-औसा-उमरगामार्गे पुढे हैदराबाद - धाराशिव ते सोलापूर : धाराशिव-वैरागमार्गे पुढे सोलापूर - छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर : येरमाळा-बार्शीमार्गे पुढे सोलापूर - लातूर ते सोलापूर : मुरूड-ढोकी-येडशी-बार्शीमार्गे सोलापूर - तुळजापूर ते बार्शी : तुळजापूर-धाराशिवमार्गे पुढे बार्शी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com