
छत्रपती संभाजीनगर : उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन शनिवारी (ता. २२) छत्रपती संभाजीनगरात येत असून त्यानिमित्त शहरात बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती ज्या मार्गांवरून जाणार आहेत, त्या मार्गांवर आज पोलिसांनी रंगीत तालीम केली. तीन तास चाललेल्या या रंगीत तालमीमुळे शहरात वाहतुकीचा खोळंबा झाला.