Traffic Fine : बाई हा काय प्रकार! दुचाकीचा दंड चारचाकीला... पोलिसांची उत्साहीपणात गंभीर चूक, नेमकं काय घडलं?
Motorcycle Traffic Fines Increase : सावज टिपण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दुचाकीच्या फोटोमध्ये अपूर्ण क्रमांकावर दंड ठोठावला, परंतु तो दंड एका कारचालकावर लागला. डॉक्टरने घरबसल्या भुर्दंडावर आश्चर्य व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगर : सावज टिपण्यासाठी टपून बसलेल्या वाहतूक पोलिसांकडून उत्साहाच्या भरात कधी-कधी गंभीर चुकाही होतात. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. ट्रिपल सीट दुचाकीचा फोटो काढला. त्यातील एक क्रमांक दिसला नाही.