
कळंब : तालुक्यातील खोंदला येथील मुसळधार पावसामुळे संतप्त झालेल्या मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे भीषण घटना घडली आहे. शेतकरी सुबराव शंकर लांडगे (वय 65 ) हे नदीवरील पुलावरून जात असताना पाय घसरल्याने थेट पुराच्या पाण्यात पडले आणि वाहून गेले आहेत.ही घटना शुक्रवारी (ता.15) सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून सकाळ पासून रेस्कीयू ऑपरेशन सुरु असून शेतकऱ्याचा शोध लागलेला नाही. दरम्यान दुपारी एनडीआरएफची टीम दाखल झाली. शनिवार (ता. 16) सकाळ पासून शोध कार्य सुरूच आहे.