
हदगाव : तालुक्यातील वरवट गावातील शेतमजूर महिला अरुणा बळवंत शक्करगे (वय ३७) या मंगळवारी (ता.२७) दुपारी मुलगी दुर्गा बळवंत शक्करगे (वय १०) व समीक्षा विजय शक्करगे (वय ७) यांच्या सोबत शेताकडून गावात येत होत्या. गावाजवळील नाल्यावरून पावसाचे पाणी वाहत होते. त्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्या तिघीही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. यात त्या तिघींचा मृत्यू झाला.