छत्रपती संभाजीनगर - ‘सगळ्या अडचणींचा सामना करून मी खूप थकलो. आयुषी तू आईची काळजी घे’ अशी मुलीला चिठ्ठी लिहून ठेवत फायनान्सचे काम करणाऱ्या व्यावसायिकाने पाचव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. १३) मध्यरात्री सूतगिरणी चौकात घडली. सुमेश सुरेश महाजन (वय ४५, रा. शारदाश्रम कॉलनी) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमेश यांचे सूतगिरणी चौकात स्वतःचे फायनान्सचे कार्यालय आहे. रात्री साडेनऊ वाजता त्यांनी मुलगी आयुषीला कॉल केला होता. यानंतर महाजन घरी परतले नव्हते. यामुळे त्यांचे कुटुंबीय त्यांच्या कार्यालयात गेले. कार्यालयात महाजन दिसून आले नाही.
मात्र, त्यांचा मोबाइल कार्यालयात आढळून आला. नातेवाइकांनी गॅलरीतून खाली पाहिले असता त्यांना सुमेश खाली कोसळलेल्या अवस्थेत आढळले. त्यांना तत्काळ घाटीत दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कार्यालयाचा पंचनामा केला असता इंग्राजीत लिहिलेली सुसाइड नोट आढळून आली. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जमादार राठोड तपास करीत आहेत.
काय आहे सुसाइड नोटमध्ये?
महाजन यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटचा आशय असा : आयुषी तू माझी प्रिय मुलगी आहेस. कृपया मी खूप थकलो. सगळ्या अडचणींचा सामना करून कंटाळलो. बेटा तू आत्मविश्वासी राहा आणि पुढे वाटचाल कर. तू मला प्रॉमिस केले असून, तू मेहनत करून ऑफिसर होणार आहेस. तुझ्या आईची काळजी घे, धन्यवाद! लवकरच पुन्हा भेटू!’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.