Sand Truck Accidentsakal
छत्रपती संभाजीनगर
Sand Truck Accident : क्रेन लावून काढला मृतदेह! वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या टायरने महिलेला चिरडले
Crane Recovery : चिकलठाण्यात वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या टायरखाली चिरडून ५० वर्षीय मालनबाई यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर मृतदेह क्रेनच्या साह्याने काढला गेला, आणि पोलिसांनी टिप्पर चालकाला ताब्यात घेतले.
चिकलठाणा : वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या टायरखाली चिरडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयासमोरील चौकात घडली.

