Electrical Shock: खांबात वीज प्रवाह उतरल्याने वृद्धेचा मृत्यू; नायगाव येथील घटना, तरुणीही गंभीर
Electrical Accident : नायगावमध्ये विजेच्या खांबावर स्मार्ट मीटर बसवताना केलेल्या निष्काळजीपणामुळे ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला आणि एक तरुणी गंभीर जखमी झाली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
वाळूज : नायगाव येथे वीज खांबात वीज प्रवाह उतरल्याने एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. मदतीसाठी आलेली तरुणी गंभीर जखमी झाली. तान्हाबाई नाथू चव्हाण (रा. भेंडाळा, ता. गंगापूर) असे मृताचे नाव आहे.