Food Poisoning : अन्नातून विषबाधा झालेल्या मुलाचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना, ८० वऱ्डाडींना डिस्चार्ज, २७ जणांवर ‘घाटी’त उपचार
Kannad News : कन्नड तालुक्यातील अंबाला गावातील विवाहसोहळ्यात अन्नातून विषबाधा होऊन २५५ जणांना त्रास झाला. या दुर्घटनेत आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून २७ जणांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कन्नड : तालुक्यातील अंबाला येथील विवाह सोहळ्यात २५५ जणांना जेवणातून विषबाधा झाली. ही घटना शनिवारी (ता. २६) रात्री उघडकीस आली. यामध्ये सुरेश गुलाब मधे (वय ८, रा. महादेवखोरा, ता. कन्नड) या बालकाचा मृत्यू झाला.