
बजाजनगर : छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावर पंढरपूर येथील तिरंगा चौकात शहरातून येणारी दुचाकी व टँकरचा विचित्र अपघात झाला. यामध्ये दुचाकीवर पाठीमागे बसलेली पत्नी टँकरच्या मागील चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्या. तर, पती गंभीर जखमी आहे. ही घटना मंगळवारी (ता.२६) सायकांळी साडेसहाच्या सुमारास घडली.