नागरी सहकारी बँकांच्या अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण

नागरी सहकारी बँकांच्या  अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण
Published on: 
नागरी बँकांच्या अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण ----- रिझर्व्ह बँकसह जिल्हा असोसिएशनचा पुढाकार लातूर, ता. २३ ः भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आणि लातूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. २५) नागरी सहकारी बँकांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच यावेळेत येथील एमआयडीसीतील जेएसपीएम शैक्षणिक संकुलातील सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनचे राज्या अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, आरबीआयच्या ट्रेनिंग मॅनेजर कृष्णा फुटाणे आणि आरबीआय, नागपूरचे सहायक व्यवस्थापक कैवल्य साकळगावकर हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच लातूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष सुहास पाचपुते यांचीही उपस्थिती राहणार आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेत नागरी सहकारी बँकांसमोरील विविध आव्हाने व अडचणी, सायबर सुरक्षा, भारतीय रिझर्व्ह बँक व शासनाची धोरणे, तसेच बँकिंग क्षेत्रातील वेगाने होणारे बदल आदी महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बदलत्या बँकिंग व्यवस्थेत अधिकारी व कर्मचार्‍यांचे ज्ञान अद्ययावत करणे, सायबर सुरक्षेविषयी जागरूकता वाढविणे आणि बँकिंग व्यवहार अधिक सक्षम व सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तरी लातूर जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी या विशेष प्रशिक्षण कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन लातूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन सराफ यांनी केले आहे. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com