वृक्षतोडीविरोधात कवींचा कवितांतून हुंकार

वृक्षतोडीविरोधात कवींचा कवितांतून हुंकार
Published on: 
वृक्षतोडीविरोधात कवितांतून हुंकार एक कविता झाडासाठी ः २५ कवींनी जागविली वृक्षसंवर्धनाची जाणीव समर्थनगर, ता. ४ ः भीमाशंकर येथे सुरू असलेल्या वृक्षतोडीला विरोध दर्शविण्यासाठी गांधी भवन येथे नुकतेच निसर्गप्रेमी कवींनी एकत्र येत कवितांच्या माध्यमातून आवाज उठविला. ‘एक कविता झाडासाठी’ या उपक्रमांतर्गत आयोजित कवी संमेलनात २५ कवींनी झाडे आणि निसर्गाच्या महत्त्वावर आधारित स्वरचित कविता सादर केल्या. कवितांतून वृक्षसंवर्धनाचा संदेश देत पर्यावरण रक्षणाच्या चळवळीला साहित्यिकांनी साथ दिली. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी दासू वैद्य होते. प्राचार्य राम चव्हाण आणि प्रा. ह. नि. सोनकांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले. साहित्यिकांनी वृक्षसंवर्धनाच्या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी कवींचे अभिनंदन केले. महात्मा गांधी स्मारक निधी केंद्राचे कार्याध्यक्ष डॉ. मच्छिंद्र गोर्डे, विजय राऊत, विवेक जैस्वाल, डॉ. मानसी बाहेती, डॉ. संतोष तांदळे यांच्यासह वृक्षसंवर्धनासाठी कार्य करणारे कार्यकर्ते प्रमुख उपस्थित होते. संगीता चव्हाण, ॲड. कैलास कोळपकर, प्रयास फाउंडेशनचे मनोहर सखाराम महाडिक, रमेश ठोंबरे, डॉ. अमरजित बाहेती, अंजली दीक्षित, सुनीता कपाळे, तन्वी न्यायाधीश, ऋषभ कुलकर्णी, कविता जाधव, सुनीलकुमार सोळंके, आदित्य इंगळे, माधव कुलकर्णी, डॉ. भारतभूषण, बलराज संघई, डॉ. सुशीलकुमार सातपुते, दीपक नागरे, मोहन प्रधान, आर.पी. शिखरे, शीतल रामकृष्ण भोईटे, नितीन तेलगावकर, भारत हाजगुडे आणि आशा डांगे या कवींनी स्वरचित कविता सादर केल्या. आपल्या प्रतिभेतून त्यांनी सृष्टीतील झाडांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रास्ताविक बोधिमित्र राजेश भोसले यांनी केले. डॉ. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक आशा डांगे, डॉ. सविता लोंढे, पद्माकर काळे, कबीर इंगळे आणि नीलेश हरणवाल यांनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.