छत्रपती संभाजीनगर : वाढत्या प्रदूषणामुळे हवा विषारी होत आहे. हे टाळण्यासाठी योग्य झाडांची लागवड करावी. झाडे हवेतील धूलिकण आणि विषारी वायू शोषतात आणि वायुप्रदूषण कमी होते. कडुनिंब, वड, पिंपळ, आंबा, बदाम ही प्रदूषके अधिक शोषतात. .झाडे उष्णता आणि धूलिकण, प्रदूषके शोषण्याचे काम करतात. त्यांची मुळे खोलवर वाढल्यास जमिनीतही योग्य प्रमाणात पाणी आणि पोषक घटक टिकून राहतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि शुद्ध हवा निर्माण करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या झाडांची निवड करणे आवश्यक आहे..कोणती झाडे लावावी-२१ टक्क्यांपेक्षा अधिक धूलिकण शोषण क्षमता असलेली झाडे ः अमलतास, पाइन, शमल, पळस, सटाणी, अशोका, जंगल बदाम, अर्जुन, खजूर, पिल्किन, पापडी, ब्ल्यूगम, महुआ, चाकटोरा, मध्यम झाडे ः बोगनवेल.- ११ ते २१ टक्के धूलिकण शोषणारी मोठी झाडे ः कडुनिंब, वड, सुबाभूळ, चिलगोजा, रबर, शुगर ॲपल, आंबा, पिंपळ, विलायती किकर, जांब, जांभूळ, टीक, निंबोणी, शिसम, सल, गुलमोहर, शिरीस, जॅकफ्रुट, टॉर्च ट्री, मध्यम प्रकारातील झाडे ः बांबू, दुधी, गुलाब, बेशरम, चांदणी, लहान प्रकारातील झाले ः लिली, सूर्यफूल, झेंडू, मनी प्लांट..काय होतो परिणामकणांच्या स्वरूपात वायू प्रदूषणामुळे ब्राँकायटिसची लक्षणे दिसतात. काचबिंदू, हृदयविकाराचा झटका, रक्तवहिन्यांच्या कार्यात बदल, ऑटिझम, उच्च रक्तदाब, मुलांमधील विकासात्मक समस्या वाढतात. .झाडे काय करतात?झाडांच्या पानांवरील लहान छिद्रे विषारी प्रदूषक असलेली हवा शोषतात. एकदा शोषल्यानंतर हे वायू पानांच्या आतील पृष्ठभागावर पसरतात आणि विघटित होतात; तसेच झाडे त्यांच्या वनस्पतींच्या पृष्ठभागावर तात्पुरते पकडून हवेतील काही कणयुक्त पदार्थ काढून टाकतात. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हे कण झाडावरून धुऊन मातीत वाहून जातात. हवेतील प्रदूषक शोषून घेणे आणि श्वास घेण्यासाठी स्वच्छ ऑक्सिजन सोडण्याव्यतिरिक्त, झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि त्याचा वापर त्यांची पाने, फांद्या, खोड, मुळे आणि माती तयार करण्यासाठी करतात..Global Warming : तापमानवाढीची जगभरात झळ; हवामान बदलामुळे मानवी आयुष्याला धोके, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त.झाडांमध्ये हवेतून कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि इतर धूलिकण, उष्णता, प्रदूषके शोषण्याची विशेष क्षमता आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी जमिनीत जेवढी तेवढीच जमिनीवर वाढतात अशी एकास एक प्रमाण असलेली झाडांची लागवड करावी. दीर्घकालीन उपाययोजना म्हणून नैसर्गिक स्रोतांच्या वाढीसाठी वृक्षारोपण व्हावे. - डॉ. सतीश पाटील, विभागप्रमुख, पर्यावरणशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.