पीक विविधीकरण प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना ट्रायकोकार्ड, बियाणे वितरण

पीक विविधीकरण प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना ट्रायकोकार्ड, बियाणे वितरण
Published on: 
शेतकऱ्यांना ट्रायकोकार्ड, बियाणे वितरण ------------- पीक विविधीकरण प्रकल्पांतर्गत उपक्रम --- सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. २८ ः केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या प्रायोजकत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या पीक विविधीकरण प्रायोगिक प्रकल्पांतर्गत तूर उत्पादक शेतकऱ्यांना ट्रायकोकार्डचे वितरण करण्यात आले. ज्वारीच्या सुपर मोती या वाणाचे बियाणेही शेतकऱ्यांना देण्यात आले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीअंतर्गत अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पाच्या वतीने कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, मुख्य कृषीविद्याशास्त्रज्ञ डॉ. किरण जाधव यांच्यासह विद्यापीठ व कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते. आभासी माध्यमातून मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी पीक विविधीकरण, आंतरपीक पद्धती, पूरक व्यवसायांचे महत्त्व अधोरेखित केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे, कमी पाणी व खतांत कमी कालावधीत उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड करणे, शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. भगवान आसेवार यांनी दुष्काळी परिस्थितीत ज्वारी व करडई पिकांचे महत्त्व स्पष्ट केले. कमी पाण्यात उत्पादन देणाऱ्या आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणाऱ्या पिकांची निवड करण्याचे आवाहन त्यांनी केले. ---- ((चौकट))) पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन डॉ. किरण जाधव यांनी प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देत तुरीच्या ‘गोदावरी’ वाणाची कामगिरी आणि उत्पादन तंत्रज्ञान विशद केले. ट्रायकोकार्डचा योग्य वापर व तुरीच्या फुलोऱ्यानंतरच्या अवस्थेतील पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे पीक विविधीकरण, कमी खर्चातील शेती तंत्रज्ञान, पाणीटंचाईत योग्य पीकनिवडीबाबत शेतकऱ्यांत जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com