कमरेला कट्टा लावून फिरणाऱ्या
ट्रक चालकाला बीडमध्ये बेड्या
बीड ः कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या ट्रक चालकास स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी बेड्या ठोकल्या. सत्यम अशोक कासार (वय २३) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रिलायन्स मॉलजवळ चालक पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती सपोनि धनराज जारवाल यांना मिळाली. पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकून त्याच्याकडून एक कट्टा, ४ काडतुसे असा ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलिस अधिकारी व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीने केली.
------
AMM26A00555 ः गांधनवाडी ः सेवानिवृत्त पॅरा कमांडो एसीपी नायक भिकाजी पाचपुते यांचा सपत्नीक मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पॅरा कमांडो भिकाजी पाचपुते यांचा
सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न
अंमळनेर ः भारतीय सेनेत १७ वर्षे सेवा बजावलेल्या एसीपी नायक भिकाजी राजेंद्र पाचपुते यांचा सेवापूर्ती सोहळा पार पडला. महंत विठ्ठल महाराज, सागर धस, आमदार सुरेश धस, यश आजबे, बाळासाहेब आजबे, रामकृष्ण बांगर, विष्णूपंत चव्हाण, अशोक जेधे, अशोक महाराज, कुरुजी महाराज, ऋषिकेश महाराज, महेश खेंगरे, संजय घोशिर, भाऊसाहेब भवर, अशोक पवार, कुंमखाले सर, संदीप इथापे, झानेश्वर पाचपुते, शंकर पोकळे, शफिक इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती. पाचपुते यांनी जम्मू-काश्मीर, अरुणाचलमधील अनुभव मांडले. सूत्रसंचालन भाऊसाहेब ससे यांनी केले, तर फौजी सतीश पाचपुते यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता झाली. ग्रामस्थांनी पाचपुते यांच्या देशसेवेचा विशेष गौरव करत सत्कार केला.
------
ग्रामस्थांचे उपोषण सहाव्या दिवशी मागे
परळी वैजनाथ ः परळी तालुक्यातील इंदपवाडी-डाबी-नागापूर या रस्त्याचे रखडलेले काम एका महिन्यात सुरू करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी गुरूवारी उपोषण मागे घेतले. या मागणीसाठी ग्रामस्थ जिरेवाडी येथे बेमुदत उपोषणाला बसले होते. आंदोलनात सरपंच शालूबाई फुलचंद मुंडे, गोविंद फुलचंद मुंडे, उमेश रोडे, केशव मुंडे, सतीश मुंडे, महादेव मुंडे, गजानन मुंडे सहभागी झाले होते. गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन रस्त्याचे काम एका महिन्यात सुरू करण्याचे लेखी पत्र दिले. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी सहा दिवसांचे उपोषण मागे घेतले. रस्ता त्वरित सुरू होणार असल्याने परिसरातील सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून आंदोलनाची यशस्वी सांगता झाली असून सर्वांनी आभार मानले आहेत.
-----------
अखिल भारतीय छावा संघटनेचे
दुष्काळ निवारणासाठी निवेदन
बीड ः अखिल भारतीय छावा संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मराठवाड्यातील दुष्काळजन्य परिस्थितीबाबत निवेदन दिले. क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील मराठवाडा आर्थिक विकास महामंडळाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. राज्यात पिके वाळल्याने दुष्काळ निवारण उपाययोजना करून कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा, असे नमूद आहे. यावेळी नेते विजयकुमार घाडगे पाटील, सल्लागार भगवान दादा माकणे, अशोक रोमन, अशोक मोरे, दीपक नरवडे व संदीप ताडगे उपस्थित होते. शेतकरी व सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढा सतत सुरूच ठेवण्याचा ठाम निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे. शासनाने या गंभीर विषयावर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी शेवटी केली आहे.
------
आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षकांना
आगाऊ वेतनवाढ देण्याची मागणी
आष्टी ः जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या आगाऊ वेतनवाढीत २०१८ नंतरच्या शिक्षकांवर अन्याय होत आहे. शासनाने हा भेदभाव दूर करून लाभ द्यावा, अशी मागणी शिक्षक समन्वय समितीचे बीड जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ लाड यांनी केली. ४ सप्टेंबर २०१८ च्या निर्णयाने ही तरतूद बंद केली. कोर्टाच्या लढाईनंतर २०१८ पर्यंतच्या शिक्षकांना लाभ मिळाला, मात्र नंतरचे शिक्षक वंचित राहिले. डिजिटल शाळा व शिष्यवृत्ती वर्ग चालवणाऱ्या या गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी शासनाने २०१८ नंतरच्या सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ पूर्ववत सुरू करावी, अशी आग्रही मागणी गोरक्षनाथ लाड यांनी शासनाकडे केली आहे. अन्याय दूर करावा, अशी विनंती सर्व शिक्षकांनी केली आहे.
-------
चंपावती शाळेत विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे
बीड ः विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृतीसाठी चंपावती शाळेत शिबिर झाले. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक समीर शेख, प्रोबेशनरी डीवायएसपी भरत पांढरे यांच्या सूचनेनुसार प्रभारी निरीक्षक वैभव पाटील व पोलिस उपनिरीक्षक विजय जाधवर यांनी मार्गदर्शन केले. १८ वर्षांखालील मुलांनी वाहने चालवू नयेत, असे आवाहन जाधवर यांनी केले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका नयना कुलकर्णी, उपमुख्याध्यापक एम. पी. महाजन, पर्यवेक्षक यू. एस. घाडगे, शिक्षक राहुल परळकर व हवालदार अजिनाथ मुंडे उपस्थित होते. रस्ते अपघात कमी करण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे जाधवर यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन राहुल परळकर यांनी केले, तर आभार नयना कुलकर्णी यांनी मानले. सर्वांनी उपक्रमाचे कौतुक केले.
----------
चारा टंचाईग्रस्त गावांत डेपो सुरू करा ः धस
आष्टी ः आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यांत पावसाअभावी पाणी व चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. त्यामुळे चारा टंचाईग्रस्त गावांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक तेथे शासकीय चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने चाऱ्याचे उत्पादन घटले असून दर प्रचंड वाढले आहेत. पशुपालन हा मुख्य व्यवसाय असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाने गावनिहाय पशुधनाची मोजणी करून चाऱ्याची सोय करावी आणि पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था करावी, असा आग्रह आमदार सुरेश धस यांनी धरला आहे. यावर शासनाने त्वरित निर्णय घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
---------
चार एकरांतील टोमॅटो काढण्याची वेळ
अंबाजोगाई ः टोमॅटोचे दर कोसळल्याने हणमंतवाडी येथील शेतकरी महादेव कराड यांच्यावर चार एकरांतील टोमॅटो मोडून टाकण्याची वेळ आली. कराड यांनी लागवडीसाठी २ लाख रुपये खर्च केले होते. निझामाबाद बाजारात दर २०० रुपयावरून थेट ८० रुपयांवर घसरला. त्यामुळे वाहतूक खर्चही निघणे अशक्य झाले. ४ एकरांतून केवळ ४० हजारांचे उत्पन्न मिळाले. अतिरिक्त मजुरीचा खर्च करून राहिलेला टोमॅटो उपटून टाकावा लागला. सरकारने टोमॅटोला हमीभाव द्यावा, अशी मागणी महादेव कराड यांनी केली. डाळी-साखरेचे भाव वाढले, मात्र भाजीपाल्याला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मदत न मिळाल्यास शेतकरी उद्ध्वस्त होतील, असे त्यांनी सांगितले. शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------
AST26B01176 आष्टी : तालुक्यातील धानोरा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात तब्बल १००१ वृक्षांची लागवड करण्यात आली
धानोरा महाविद्यालयात १००१ वृक्षांची लागवड
आष्टी ः पर्यावरण संतुलनासाठी धानोरा महाविद्यालयात १००१ वृक्षांची लागवड करण्यात आली. माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या कल्पनेतून हा उपक्रम झाला. झाडांची देखभाल करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे प्राचार्य डॉ. एस. एन. वाघुले म्हणाले. प्रा. राजू शेलार व प्रा. निसार शेख यांनी मार्गदर्शन केले. या मोहिमेसाठी प्रा. गहिनीनाथ एकशिंगे, प्रा. विवेक महाजन, प्रा. आजिनाथ गिलचे, प्रा. सुभाष मोरे, प्रा. आतेश बनसोडे, प्रा. शबाना शेख, प्रा. जयश्री बोडखे, प्रा. ज्ञानदेव बोडखे, प्रा. सतीश तागड, प्रा. बालशंकर, प्रा. संजय झांजे व प्रा. वाळके यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसराचे सौंदर्य वाढले असून सर्वत्र कौतुक होत आहे.