Dharashiv News : तुळजाभवानी मातेचे धार्मिक विधी कवड्यांची माळ घालूनच !

‘जीआय’ मानांकनामुळे तुळजापूरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा
dharashiv
dharashivsakal

तुळजापूर : तुळजाभवानी मातेच्या कवडीचे पौराणिक, धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व आहे. तुळजाभवानी मातेचे भाविक धार्मिक विधींच्या वेळी कवड्याची माळ घालूनच धार्मिक विधी करतात. तुळजाभवानी मातेच्या कवडीस जीआय मानांकन मिळाल्याने तुळजापुरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा प्राप्त झालेला आहे.

कवडीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. पिवळी कवडी, पांढरी कवडी, राजा कवडी, तपकिरी कवडी असे यामध्ये प्रकार आहेत. तुळजाभवानी मातेची कवडी पिवळी कवडी असून पांढरी कवडी ही येरमाळा येथील येडाई देवीची आहे. तुळजाभवानी मातेचा जोगवा मागताना कवड्यांची माळ गळ्यामध्ये घालून जोगवा मागितला जातो.

dharashiv
Dharashiv News : हे तर पालकमंत्र्यांचे सालगडी

तुळजाभवानी मातेस पोत ओवाळताना ही कवड्याची माळ गळ्यामध्ये घातली जाते. आराधिनी महिला कवड्याच्या माळा, कवड्याचा टोप घालून नवरात्रात आणि बारा महिने ही वावरतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही कवड्याची माळ गळ्यात घालूनच राज्यकारभार केला होता ही बाब सर्वश्रूत आहे. कवड्या ह्या समुद्रामधून येथे आणल्या जातात. त्याच्या माळा तुळजापूरात तयार केल्या जातात. कवड्यांची माळ घालताना प्रारंभी तुळजाभवानी मातेसमोर परडीमध्ये ठेवून पुन्हा ती घातली जाते. कवडीची माळ आणि परडी सोबत असताना त्यास पुरणपोळीचा नैवेद्य भाविक आवर्जून आणतात.

कवडी ही एक महत्त्वपूर्ण पुजेच्या प्रकारातील जिन्नस आहे. कोणताही धार्मिक विधी करताना कवडीला स्मरून धार्मिकविधी भाविक करतात.तुळजाभवानी मातेच्या कवडीच्या माळा तयार करणाऱ्या अनेक महिलांना कवडीच्या माळांपासून तुळजापूरात रोजगार मिळालेला आहे.

कवडीची माळ साधारणपणे ३० रुपयांपासून ते साडे पाचशे रुपयांपर्यंत विक्री केली जाते. तुळजाभवानी मंदिरात आराध्य बसल्यानंतर कवडीची माळ घालणे अनिवार्य असते. तसेच कवडीच्या माळेचे पावित्र्य जपणे ही आवश्यक असते. अशौच काळात कवड्यांची माळ परिधान करता येत नाही. कवड्यांची माळ महिला, पुरूष, आराधिनी महिला, तृतीयपंथी परिधान करतात.

dharashiv
Dharashiv Crime News : राष्ट्रीय महामार्गावर वाटमाऱ्यांचा अड्डा

तुळजाभवानी मातेच्या कवड्यांच्या माळेबाबत वस्तुनिष्ठ माहिती आपण दिलेली आहे. तसेच कवडीची माळ ही अनेक धार्मिक विधींच्या वेळी परिधान केली जाते. तसेच स्थानिक नागरिक तसेच तुळजाभवानी मातेचे सर्वच पुजारी, तुळजाभवानी मातेचे भाविक ही कवड्यांची माळ परिधान करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कवड्यांची माळ परिधान केली होती ही बाब सर्वश्रुत आहे. कवड्याच्या माळेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

- योगेश पाठक, तुळजाभवानी मातेचे उपाध्ये पुजारी तसेच तुळजापूर येथील कवड्यांचे व्यावसायिक, तुळजापूर. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com