Tuljabhavani Temple: तुळजाभवानीमातेची शेजघरात निद्रा;तुळजापूर : ११ ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत सुरू राहणार

Tuljabhavani Temple, Shėjghar Nidra, Tuljapur : तुळजाभवानी मातेची शेजघरातील निद्रा शनिवारी सायंकाळी सुरू झाली असून ११ ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत ही पारंपरिक निद्रा सुरू राहणार आहे.
Tuljabhavani Mata was ceremonially moved to the Shėjghar as the traditional period of rest began before Navratri.

Tuljabhavani Mata was ceremonially moved to the Shėjghar as the traditional period of rest began before Navratri.

esakal

Updated on: 

तुळजापूर, : श्री तुळजाभवानी मातेची शेजघरातील निद्रा शनिवारी (ता. तीन) सायंकाळी सुरू झाली. येत्या ११ ऑक्टोबरला पहाटेपर्यंत देवीची शेजघरातील निद्रा सुरू राहणार आहे. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात शनिवारी सकाळी सातपासूनच आराधी महिला देवीच्या गादीचा कापूस निवडण्यासाठी गणेश विहार तसेच सीमोल्लंघन पारासमोर येऊन बसल्या होत्या. हातात परडीमध्ये देवीच्या गादीचा कापूस महिला निवडत होत्या. तुळजाभवानी मातेचा महिमा काव्यामध्ये व्यक्त करून देवीची गीते महिला गात होत्या. हातामध्ये टाळ घेऊन आराधी मंडळींनी देवीची पारंपरिक गीते सादर केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com