तुळजापूरातून
दागिने लंपास
धाराशिव : तुळजापूर शहरातील एसटी कॉलनी परिसरातील बंद घराच्या कपाटातून ८५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. एसटी कॉलनीतील रहिवासी सचिन कालीदासराव घोगरे (वय ४६) यांच्या राहत्या घरातील कपाटात ठेवलेले १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने असा एकूण ८५ हजार रुपयांचा ऐवज शुक्रवारी (ता.२) दुपारी एकच्या सुमारास चोरीस गेला. विलास पद्माकर देशमुख (रा. तीर्थ तुळजापूर) याने चोरून नेल्याचा आरोप आहे. सचिन घोगरे यांनी (ता.३) दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
........
जवळगा मेसाई
येथून एकाचे अपहरण
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई येथून एका ४५ वर्षीय व्यक्तीचे अज्ञात कारणासाठी अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे.
जवळगा मेसाई येथील रहिवासी मधुकर उद्धव कदम (वय ४५) हे १७ सप्टेंबरला दुपारी चारच्या सुमारास गावातून अचानक गायब झाले. अज्ञात व्यक्तीने त्यांना गुप्तपणे व बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्याच्या उद्देशाने पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी त्यांची आई मंगल उद्धव कदम (वय ६२) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून शनिवारी (ता.३) तुळजापूर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे.