हळदीला जागतिक बाजारपेठेची संधी; औषधी गुणधर्मांवर होणार संशोधन

हळदीला जागतिक बाजारपेठेची संधी; औषधी गुणधर्मांवर होणार संशोधन
Published on: 
ABD26J82803 लखनौ ः बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र आणि सीएसआयआर-भारतीय विषविज्ञान संशोधन संस्था (आयआयटीआर) यांच्यात सामंजस्य करार झाला. याप्रसंगी राज्यमंत्री डाॅ. अनंतकुमार हेडगे, हेमंत पाटील, डाॅ. ए. कलाईसेल्वी, डाॅ. जयकर शेट्टी, द्विजेंद्र माथुर आदी. ----------------- हळदीला जागतिक बाजारपेठेची संधी! ------ सीएसआयआर आणि हळद संशोधन केंद्रात सामंजस्य करार --- हिंगोली, ता. ६ : जिल्ह्यातील हळदीला जागतिक बाजारपेठेत नवी ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हळदीतील कर्क्यूमीन आणि इतर औषधी घटकांवर जागतिक मानकांनुसार सखोल संशोधन केले जाणार आहे. यासाठी वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र आणि सीएसआयआर-भारतीय विषविज्ञान संशोधन संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. लखनौ येथे झालेल्या ‘सीएसआयआर’च्या ६२ व्या वार्षिक उत्सवात हा करार झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सीएसआयआरच्या महासंचालक तथा केंद्र सरकारच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन विभागाच्या सचिव डॉ. एन. कलाइसेल्वी होत्या. यावेळी हरिद्रा केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, माजी केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. अनंतकुमार हेगडे, पद्मश्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे महासंचालक डॉ. जयकर शेट्टी, फेअर लॅब्सचे व्यवस्थापकीय संचालक द्विजेंद्र माथुर, संशोधन परिषदेचे अध्यक्ष प्रा. जावेद इक्बाल, ‘सीएसआयआर’चे संचालक डॉ. भास्कर नारायण, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवी राम, डॉ. के. सी. खुलबे, हरिद्रा संशोधन केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कच्छवे, हळद केंद्राचे करार समन्वय तथा संशोधक सहयोगी डॉ. अनिकेत पाटील, डॉ. प्रसाद गंगाखेडकर, शास्त्रज्ञ नागेश दत्तगोंडे, प्रिया गावंडे, विधी पळसापुरे, तंत्र सहायक पंकज कदम आदी उपस्थित होते. या कराराअंतर्गत हिंगोलीच्या हळदीमधील ‘कर्क्युमिन’ आणि इतर औषधी घटकांवर जागतिक मानकांनुसार सखोल जैव-वैज्ञानिक संशोधन केले जाईल. या कराराअंतर्गत हिंगोलीच्या हळदीतील कर्क्यूमीनसह अन्य औषधी घटकांचे जैव-वैज्ञानिक संशोधन, गुणवत्ता तपासणी आणि विषविज्ञानविषयक सुरक्षा मूल्यांकन केले जाणार आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत हळदीची निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेले सुरक्षा दाखले मिळविण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. ----- औषधी गुणधर्मांवर होणार संशोधन विशेष म्हणजे, हळदीवर प्रक्रिया करून प्रगत औषधे, न्यूट्रास्युटिकल्स आणि सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे केवळ कच्च्या हळदीच्या विक्रीपुरते मर्यादित न राहता मूल्यवर्धित उत्पादनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्याची संधी निर्माण होणार आहे. या संशोधनामुळे हिंगोलीच्या हळदीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.