अभ्यासाचा तणाव बेतला जीवावर... १८ वर्षांच्या तरुणीने घेतला गळफास!

exam stress Suicide
exam stress Suicidesakal
Updated on

औरंगाबाद : बारावीत शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय तरुणीने परीक्षेच्या तणावातून राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता.३) सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. उषा कृष्णाचंद्र चौधरी (१८ रा. शंभूनगर) असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे.

उषा ही देवनागरी परिसरातील एका महाविद्यालयात बारावीत शिकत होती. तिचे वडील कृष्णाचंद्र हे फरशी बसवण्याचे काम करतात, तर आई घरकाम करते. तिला एक लहान भाऊ आहे. दरम्यान उषाला एमबीबीएस करायचे होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती. दरम्यान शुक्रवारी (ता.३) वडील नियमित कामासाठी गेले होते. सायंकाळच्या सुमारास उषाचा लहान भाऊ बाहेर खेळत असताना उषाने आईला अभ्यास करण्यासाठी पेपर आणण्यासाठी दुकानात पाठवले. आई पेपर आणण्यासाठी गेली असता उषाने घरातील फॅनच्या हुकला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला.

काही वेळाने आई घरी येऊन दरवाजा ढकलून बघितले असता उषाने गळफास घेतला होता. यावेळी आरडाओरड झाल्याने शेजारील नागरिकांच्या मदतीने तिला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान उषाने परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केली असा अंदाज नातेवाइकांनी वर्तवला आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chhatrapati Sambhajinagar
Yellow date farming success story in Marathwada earning Rs 3 lakh per acre
Who can apply for BAMU direct admission 2026?
Food safety raid in Chhatrapati Sambhajinagar
Marathi News Esakal
www.esakal.com