Chh. Sambhajinagar Accident : टेंपो उलटल्यामुळे दोन ठार, ९ जखमी; फुलंब्री-खुलताबाद मार्गावरील घटना
Accident News : फुलंब्री-खुलताबाद रस्त्यावरील येसगाव बसस्थानकाजवळ टेंपो उलटून दोन जण ठार, तर नऊ जण जखमी झाले. ही दुर्घटना चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडली असून जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फुलंब्री : टेंपो (छोटा हत्ती) उलटून दोन ठार; तर नऊ जण जखमी झाल्याची घटना फुलंब्री -खुलताबाद मार्गावरील येसगाव येथील बसस्थानकासमोर शुक्रवारी (ता. सहा) सकाळी नऊच्या सुमारास घडली.