
Petrol Explosion
sakal
पाचोड : पैठण तालुक्यातील खंडाळा येथे पेट्रोलच्या बाटलीचा अचानक भडका होऊन एकाच कुटुंबातील चारजण गंभीर जखमी झाले होते. ही घटना २४ सप्टेंबरला घडली होती. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना आकाश प्रकाश दळवी (वय १५), अविनाश प्रकाश दळवी (वय २४) या दोघा भावंडांचा रविवारी (ता.पाच) मृत्यू झाला.