
छत्रपती संभाजीनगर : मानसिक अवस्थेमुळे स्वतःचेच केस उपटण्याचा आणि केस खाण्याचा विचित्र आजार असलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर शहरात उपचार सुरू आहेत. ट्रिकोटिलोमॅनिया आणि ट्रिकोटिलोफॅगिया ही या आजारांची नावे असून, याबाबत फारशी जागरूकता नसल्याने नेमके उपचार मिळण्यास वेळ लागतो.