उदगीरमध्ये १ लाख १५ हजारांचा गुटखा जप्त

उदगीरमध्ये १ लाख १५ हजारांचा गुटखा जप्त
Published on: 
उदगीर शहरात गुटखा जप्त उदगीर, ता. २२ (बातमीदार) : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या एकाला उदगीर ग्रामीण पोलिसांनी पकडले. बिदर गेट येथील ठाकरे चौक परिसरात बुधवारी (ता. २१) रात्री साडेनऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत १ लाख १५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, फिरदोस हबीब पठाण (वय ३५, रा. दबीरपुरा, शकील चौक, उदगीर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरदोस पठाण हा दुचाकीवरून प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून त्याच्याकडील मुद्देमाल ताब्यात घेतला. गुटखा, सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली होंडा दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली. जप्त केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची किंमत ६५ हजार २०० रुपये, तर दुचाकीची किंमत ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिस अंमलदार सचिन नाडागुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक डी. डी. गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस.बी.केंद्रे पुढील तपास करीत आहेत. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com