उदगीरकरांना पाणी बचतीचा मंत्र

उदगीरकरांना पाणी बचतीचा मंत्र
Published on: 
उदगीरकरांना पाणी बचतीचा मंत्र ---- शाळांमधून जनजागृती; घरोघरी पत्रके वाटून देणार संदेश ---- उदगीर, ता. १० (बातमीदार) : शहरातील पाणी समस्येवर उपाययोजना करण्यासह उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय सद्‍भावना मंचच्या बैठकीत घेण्यात आला. पाणी बचतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले. मंचचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. आठ) बैठक झाली. शहरातील पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यय टाळणे आणि उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्याबाबत जनजागृती करण्यावर चर्चा झाली. यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्याचे ठरले. शहरातील प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे महत्त्व, पाण्याचा योग्य वापर आणि बचतीच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा संदेश त्यांच्या कुटुंबापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच पाणी बचतीचा संदेश देणारी पत्रके तयार करून ती घरोघरी वितरित करण्यात येणार आहेत. पाणी ही मौल्यवान नैसर्गिक संपत्ती असून तिचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे आवाहन करण्यात आले. --- नाना पाटेकर यांना आदरांजली बैठकीदरम्यान मंचच्या वतीने दिवंगत कलाकार नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सचिव डॉ. शेख असगर, उपाध्यक्ष विश्वनाथ बिरादार, बाबूराव माशाळकर, प्रा.डॉ. बलिराम भुक्तरे, मुडपे गुरुजी, शेख इसहाक, हाश्मी सय्यद, हकीम शेख व मुजीब देवणीकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com