इंद्रधनू वृद्धसेवा केंद्रात

इंद्रधनू वृद्धसेवा केंद्रात
Published on
संगीत मैफिलीत ज्येष्ठांनी घेतला सदाबहार गीतांचा आनंद उमरगा, ता. ३१ (बातमीदार) : ‘जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे...’ या उक्तीचा प्रत्यय देणाऱ्या उमरगा येथील ‘इंद्रधनू वृद्धसेवा केंद्रा’त वृद्धापकाळातील मावळतीचे क्षण आनंदाने जगणाऱ्या ज्येष्ठांसाठी ‘गाता रहे मेरा दिल’ या कराओके संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. सदाबहार गीतांच्या या मैफिलीत ज्येष्ठांनी गाण्यांचा मनमुराद आनंद लुटत तारुण्यातील आठवणींना उजाळा दिला. संगीत रजनीचे सादरीकरण निर्माता व गायक आनंद मोरे, गायक संतोष बोडरे आणि बालाजी बडुरे यांनी केले. आनंद मोरे यांनी ‘विठू माउली तू माउली जगाची’, ‘राधा ही बावरी’ आणि ‘सुख के सब साथी, दुःख में न कोय’ ही गाणी सादर करून ज्येष्ठांच्या भावविश्वाला स्पर्श केला. बालाजी बडुरे यांनी ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे...’ हे गीत सादर करत आयुष्याच्या परतीच्या प्रवासातही प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा संदेश दिला. मैफिलीत केंद्रातील महिलांनीही अभंग, गवळणी, भक्तिगीते आणि भावगीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी इंद्रधनूचे व्यवस्थापक प्रा. मारुती खमितकर, किरण बेळंबकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. ९० वर्षीय मुरलीधर चव्हाण यांनी ‘सांगा देवा मी काय करू...’ हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com