उमरग्यात राष्ट्रीय लोकअदालतीत ७२९ प्रकरणांत पावणेतीन कोटींची तडजोड

उमरग्यात राष्ट्रीय लोकअदालतीत ७२९ 
प्रकरणांत पावणेतीन कोटींची तडजोड
Published on
उमरग्यात राष्ट्रीय लोकअदालतीत ७२९ प्रकरणांत पावणेतीन कोटींची तडजोड - - ​उमरगा, ता. १३ (बातमीदार) : उमरगा न्यायालय व विधिज्ञ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. १२) आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत प्रलंबित व दावापूर्व अशा ७२९ प्रकरणांत तडजोड घडवून दोन कोटी ७६ लाख ३७ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचा यशस्वी निपटारा करण्यात आला. लोकअदालतीचे कामकाज सुलभ होण्यासाठी चार पॅनेल नियुक्त करण्यात आले होते. यात जिल्हा न्यायाधीश ए.एम. खान, सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एम.एस. रचभरे, तिसरे सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) गजानन बी. जानकर व सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) के.एन. निवडंगे यांनी पॅनेलप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली. ​एकूण १,८४६ प्रलंबित प्रकरणांपैकी १५६ प्रकरणे निकाली निघून दोन कोटी ५८ लाख ११ हजार ९२८ रुपयांची तडजोड झाली. यात मोटार अपघाताच्या ८२ पैकी २६ प्रकरणांत दोन कोटी १८ लाख १० हजार रुपये निश्चित झाले. चेक बाऊन्सच्या ५ प्रकरणांत आठ लाख ९९ हजार २०० रुपये, ७६६ दिवाणी प्रकरणांपैकी ३४ प्रकरणांत ३० लाख ७९ हजार ७२८ रुपये, तर गुन्हा कबुलीच्या २८५ पैकी ९० प्रकरणांत २३ हजार रुपये निश्चित झाले. ​तसेच १,६८३ दावापूर्व प्रकरणांपैकी ५७३ प्रकरणे निकाली निघून १८ लाख २५ हजार रुपये वसूल झाले. यामध्ये उमरगा नगर परिषदेने ५५५ प्रकरणांतून १५ लाख ५४ हजार ७५९ रुपये, मुरूम नगर परिषदेने ११ प्रकरणांतून २ लाख १५ हजार ३१६ रुपये आणि स्टेट बँकेने ५५ हजार रुपये वसूल केले. ​लोकअदालत यशस्वी करण्यासाठी विधिज्ञ मंडळाचे वकील, सर्व पंच सदस्य, वरिष्ठ लिपिक डी.सी. कांबळे, कनिष्ठ लिपिक ए.आर. कांबळे, शिपाई आर.व्ही. गिरी व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. - -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com