
अंगुरीबाग : यंदा मे महिना पावसात गेला. त्यामुळे छत्र्या आणि रेनकोट बाजारात उलाढाल वाढली आहे. यावर्षी बाजारात बॉटल पॅकिंग आणि कॅप्सुल पॅकिंग छत्र्यांना नागरिकांकडून विशेष पसंती मिळत आहे. त्यांची होलसेल किंमत २५० रुपयांपासून सुरू होते; तसेच १७० ते १६०० रुपयांपर्यंतचे रेनकोट उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या आवडी लक्षात घेता सुमारे २० टक्के छत्र्या मुलांना आवडतील अशा डिझाइनच्या आहेत.