कोर्ट टुडे- कायद्यातील तरतूद- अपहरण

कोर्ट टुडे- कायद्यातील तरतूद- अपहरण
Published on: 
कायद्यातील तरतूद --- अपहरण ---- अपहरण (Kidnapping) हे दोन प्रकारचे असते. यात व्यक्तीचे भारतातून अपहरण आणि दुसरे बालक, अस्वस्थ मानसिक स्थिती असलेल्या व्यक्तीला त्याच्या कायदेशीर संरक्षकाच्या संमतीविना किंवा ताब्यातून, प्रलोभन देऊन दूर नेणे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ प्रमाणे अशा प्रकारचे अपहरण हा गुन्हा मानला जातो. भारतीय न्याय संहिता कलम १३७ मधील तरतुदीनुसार, जो कोणी, कोणत्याही व्यक्तीला, तिची संमती न घेता किंवा तिच्या वतीने संमती देण्यास कायदेशीररीत्या अधिकृत असलेल्या व्यक्तीची संमती न घेता, भारताच्या सीमांच्या पलीकडे नेतो, त्याने त्या व्यक्तीचे भारतातून अपहरण केले, असे मानले जाते. तसेच जो कोणी, एखाद्या बालकाला किंवा अस्वस्थ मानसिक स्थिती असलेल्या व्यक्तीला, त्याच्या कायदेशीर संरक्षकाची संमती न घेता किंवा प्रलोभन देऊन दूर नेतो, त्याने त्या बालकाचे किंवा व्यक्तीचे कायदेशीर संरक्षणातून अपहरण केले, असे मानले जाते. --- अशी आहे शिक्षा जो कोणी कोणत्याही व्यक्तीचे भारतातून किंवा कायदेशीर संरक्षणातून अपहरण करतो, त्याला कोणत्याही प्रकारच्या कारावासाची शिक्षा दिली जाईल, ज्याचा कालावधी सात वर्षांपर्यंत असू शकतो; तसेच तो दंडासदेखील पात्र असेल. ------ - संजय कुलकर्णी, एमए एलएलबी ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.