

छत्रपती संभाजीनगर : शहर परिसरात शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरवात झाली. अर्धा तास हा पाऊस झाला. त्यानंतर नऊच्या सुमारासही पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने थंडी जाणवली नाही. शहराचे कमाल तापमान ३०, तर किमान तापमान २२ अंश नोंदवले गेले. त्यामुळे दिवसभर उकाडा जाणवत होता.