Unknown Body Found in Bidkin : बिडकीन औद्योगिक वसाहत शिवारात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Mystery Death-Unidentified Man in Bidkin : बिडकीन औद्योगिक परिसरात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
बिडकीन : पैठण तालुक्यातील बिडकीन ते शिवणाई रोडवरील डि एम आय सी व शिवनाई गावाच्या शिवालगत असलेल्या एका शेतात अंदाजे ३८ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.