
गंगापूर/लासूर स्टेशन : सिद्धनाथ वाडगाव शिवारातील पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत चुलता ठार, तर पुतण्याचा छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. २३) घडली होती. दोघांवरही सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.