
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील करोडी येथील पत्नी पीडित पुरुष आश्रमात वटसावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ‘पिंपळ पौर्णिमा’ सामाजिक आणि न्यायिक जागृतीच्या भावनेतून साजरी करण्यात आली. पत्नी पीडित पुरुषांनी पिंपळाला दोरा बांधून त्याची पूजा केली. शिवाय पुढील सात जन्म ही पत्नी नको, असे साकडे घालण्यात आले.