जि. प. शाळेच्या वर्गखोल्या मोडकळीस

जि. प. शाळेच्या वर्गखोल्या मोडकळीस
Published on
फोटोसह ABD26J79916, ABD26J79917, ABD26J79918 पानकनेरगाव (ता.सेनगाव)ः जि. प. शाळेच्या वर्गखोलीच्या भिंतीस गेलेला तडा.( दुसऱ्या छायाचित्रात) छताच्या स्लॅबचे सिमेंट निखल्याने उघडे पडलेले गज.(तिसऱ्या छायाचित्रात) वर्गखोलीच्या फरशांची झालेली दुरवस्था. ----------- पानकनेरगाव जि. प. शाळेच्या वर्गखोल्या मोडकळीस ------------ विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात; शालेय व्यवस्थापन समितीची तक्रार सेनगाव, ता.२१ (बातमीदार): तालुक्यातील पानकनेरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील सहापैकी चार वर्गखोल्या जीर्ण व धोकादायक बनल्या आहेत. मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इयत्ता पहिली ते चौथीच्या आठ तुकड्यांत तब्बल २१५ विद्यार्थी शिक्षण घेत असताना धोकादायक वर्गखोल्यात शिक्षण घ्यावे लागत असल्याची तक्रार शालेय व्यवस्थापन समितीने शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. शाळेत सध्या सहा वर्गखोल्या असून त्यापैकी केवळ दोनच खोल्या वापरण्यायोग्य असल्याचे समितीचे म्हणणे आहे. कार्यालयीन इमारतीचीही दुरवस्था झाली आहे. विद्यार्थ्यांची संख्या आणि तुकड्यांची संख्या लक्षात घेता नवीन सात वर्गखोल्यांची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. पाण्याची टाकी व फिल्टर बसविण्याची मागणी करूनही त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचे समितीने म्हटले आहे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र व पुरेशी शौचालय व्यवस्था, हँडवॉश स्टेशन उपलब्ध नसल्याने स्वच्छता व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय शालेय पोषण आहाराचे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी कपाट व उंचीवर ठेवण्याची व्यवस्था, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे.शाळेतील धोकादायक वर्गखोल्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, विद्यार्थ्यांना सुरक्षित वर्गखोल्यांसह आवश्यक सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंजली रामेश्वर आरे, उपाध्यक्ष प्रल्हाद खेडेकर, विश्वनाथ निबलवार, सचिन देवकर, रुपाली देशमूख, शीतल देवकर, पुष्पाजली शेरकर, सिद्धान सुर्वे, विश्वनाथ कोकाटे, दिलीप जोगदंड, रामप्रसाद खेडेकर, संतोष अकमार, केशव देशमूख, पल्लवी देशमूख यांनी केली आहे. ((चौकट))) शालेय समितीचा पाठपुरावा या प्रश्नांबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद हिंगोली, ग्रामपंचायत पानकनेरगावचे प्रशासक/ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आल्याचे शालेय व्यवस्थापन समितीने सांगितले. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना न झाल्याने पालक व ग्रामस्थांत चिंता व्यक्त होत आहे. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com