
छत्रपती संभाजीनगर : अवकाळी पावसामुळे विभागात जीवित व वित्तहानी झाली आहे. गेल्या बारा दिवसांत अवकाळी पावसामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सहा जणांचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू झाला, तर आतापर्यंत १४ पशुधन दगावल्याची प्राथमिक माहिती विभागीय आयुक्तालयातून देण्यात आली, तर अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.