
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात आठवडाभरापासून मॉन्सूनपूर्व पाऊस सुरूच आहे. बुधवारी (ता.२१) रात्री सर्वदूर अवकाळी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, लातूर, परभणी, बीड, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्याला पावसाने धो-धो धुतले. यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते.