
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात सुरूच आहे. बुधवारी रात्री एकपासून विविध जिल्ह्यांत पाऊस झाला. वादळी वारा आणि विजांसह झालेल्या पावसात काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर विजा पडून दोन जणांचा मृत्यू झाला.