दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पशुधनाची नोंदणी करा

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पशुधनाची नोंदणी करा
Published on: 
‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी अद्ययावत करण्याचे आवाहन नांदेड, ता. २९ : राज्यातील दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या ३०४ तालुक्यांमध्ये पशुसंवर्धन विभागाने पशुधनाचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी नियोजन केले आहे. दुष्काळाच्या काळात पशुपालकांना चारा, चारा बियाणे, चारा ठोंबे आणि पशुवैद्यकीय उपचारांसह आवश्यक मदत वेळेत मिळावी, यासाठी ‘भारत पशुधन’ प्रणालीवर पशधनाची अद्ययावत नोंदणी करण्याचे आवाहन विभागाने केले आहे. दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना आणि मदतीचा लाभ पात्र पशुपालकांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचविण्यासाठी पशुधनाची नोंदणी महत्त्वाची आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या पशुधनाची नोंदणी तपासून आवश्यक माहिती अद्ययावत करावी. नव्याने खरेदी केलेल्या किंवा जन्मलेल्या पशुधनाचे टॅगिंग करून त्याची नोंद प्रणालीवर करावी. यासाठी पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा. नवीन पशुधनाच्या कानाला १२ अंकी ओळख क्रमांक असलेला बिल्ला (टॅग) बसवून त्याची नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. डिजिटल नोंदणीमुळे आपत्कालीन परिस्थितीत चारा, चारा बियाणे, चारा ठोंबे आणि इतर आवश्यक मदत योग्य पशुपालकांपर्यंत पोहोचविणे सुलभ होणार आहे. त्यामुळे सर्व पशुपालकांनी नोंदणी व टॅगिंगची कार्यवाही तातडीने पूर्ण करून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com