चारा छावण्या सुरु करा, दुष्काळ निधीही जमा करण्याची मागणी

चारा छावण्या सुरु करा, दुष्काळ निधीही जमा करण्याची मागणी
Published on: 
ABD26J80691 -- चारा छावण्या सुरू करा संघर्ष शेतकरी संघटनेतर्फे परिषदेत सूर छत्रपती संभाजीनगर, ता. ४ ः दुष्काळाची दिवसेंदिवस तीव्रता वाढत असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती बिकट होत चालली आहे. एकीकडे हे चित्र असताच दुसरीकडे धीम्या गतीने होणाऱ्या पंचनाम्याचा घाट घालणे बंद करून तत्काळ दुष्काळ निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, असा एकमुखी सूर संघर्ष शेतकरी संघटनेच्या बैठकीत निघाला. पिसादेवी येथे नुकतीच ‘संघर्ष परिषद’ पार पडली. या परिषदेला कृषी अभ्यासक, शेतकरी, संघर्ष शेतकरी संघटनेचे ठिकठिकाणचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यासंदर्भात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे यांनी सांगितले की, रब्बीतही पाऊस पडेल या आशेने अद्यापही चारा पुरविला जात नाही असा आरोपही गोडसे यांनी केला. दुभत्या जनावरांना हिरवा चारा न मिळाल्याने दुग्धोत्पादनात घट झाली आहे, परिणामी आधीच दुष्काळामुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा नव्या संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मागण्यांनुसार गावोगावी तत्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात, या छावण्यांमध्ये हिरवा चारा, कोरडा चारा, पिण्याचे पाणी तसेच पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्याव्यात. चारा व शासकीय सुविधांच्या वाटपात पारदर्शकता राहण्यासाठी स्वतंत्र देखरेख समिती स्थापन करावी, अशी मागणीही संघर्ष परिषदेत करण्यात आली. या मागण्या आठ दिवसांत पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचाही इशारा गोडसे यांनी दिला. ------- परिषदेत पदाधिकाऱ्यांच्या निवडी संघर्ष परिषदेदरम्यान पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यामध्ये प्रदेश युवक अध्यक्ष उदयराज गायकवाड, जिल्हाध्यक्ष नीलेश गुळसकर, युवक जिल्हाध्यक्ष आकाश वनारसे, महिला शहर उपाध्यक्ष सुनंदा सोनवणे, शहर सरचिटणीस रेखा काळे, संघटक मनीषा खैरनार आदींचा समावेश आहे. परिषदेला महिला प्रदेशाध्यक्षा कल्पना चव्हाण, बाळासाहेब भूमे, राहुल मते, रामेश्वर मोरे, साहेबराव शिंदे, नानासाहेब मुरकुटे, कृष्णा खरात, गणेश खरात, ऋषिकेश साठे, मीरा बोकण, दीपक नारळे, राम नवगिरे, आदिनाथ सोनार, गीतांजली नायक आदींची उपस्थिती होती. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com