वडगाव फाटा येथे बसथांबा मंजूर, मात्र बसेस थांबणार कधी?

वडगाव फाटा येथे बसथांबा मंजूर, मात्र बसेस थांबणार कधी?
Published on: 
वडगाव फाट्यावर थांबा मंजूर, मात्र बस थांबेनात ---------------- विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांची हेळसांड सोनपेठ, ता. १८ (बातमीदार) : तालुक्यातील वडगाव स्टेशन येथील वडगाव फाटा येथे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या थांब्यास मंजुरी मिळूनही बस थांबत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, दृष्टिहीन, सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय होत आहे. वडगाव फाटा परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी जवळच्या गावांसह तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करतात. मात्र, थांबा मंजूर असतानाही बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. परिणामी, शाळा-महाविद्यालयात वेळेवर पोचण्यात अडचणी येत असून, त्यांच्या शैक्षणिक दिनक्रमावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ, वयोवृद्ध प्रवाशांना दीर्घकाळ उभे राहावे लागते, तर दिव्यांग व दृष्टिहीन व्यक्तींना सुरक्षितपणे प्रवास करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मंजूर बसथांब्यावर नियमित बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. ------------------- अंमलबजावणीची प्रतीक्षा वडगाव स्टेशन येथे बसथांबा सुरू व्हावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बचाटे, वडगाव ग्रामपंचायतीने सातत्याने पाठपुरावा केला आहे. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, माजी आमदार सुरेश वरपुडकर, आमदार राजेश विटेकर यांच्याकडेही याबाबत प्रयत्न करण्यात आले. आता या मागणीकडे विभागीय नियंत्रक आणि संबंधित आगाराच्या अधिकाऱ्यांनीच लक्ष देऊन चालक, वाहकांना आवश्यक सूचना देण्याची मागणी केली आहे. --------- ((कोट))) थांबा मंजूर होऊनही प्रवाशांची गैरसोय कायम असेल, तर मंजुरीचा उपयोग काय असा सवाल उपस्थित करत शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी, सर्व प्रवाशांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा मिळण्यासाठी परिवहन विभागाने तातडीने कारवाई करावी. - रामेश्वर बचाटे, सामाजिक कार्यकर्ते ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com