

Water Shortage
esakal
वडवणी, : यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे वडवणी तालुक्यात ऐन सप्टेंबर महिन्यातच भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. अशातच तलावांमधील उरले-सुरले पाणी अवैध मोटारी लावून पळवले जात होते. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘सकाळ’ने २० सप्टेंबर रोजी तलाव आटले तरीही अवैध पाणी उपसा सुरूच, प्रशासनाची डोळेझाक या आशयाची सविस्तर बातमी प्रसिद्ध केली. या बातमीचा मोठा दणका बसला असून, खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने सलग दोन दिवस धडक मोहीम राबवत तालुक्यातील तलावांमधील सर्व अवैध मोटारी काढून कारवाई केली आहे.