
उमरगा : शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातील कॅडेट वैभवी गोपाळ शेंडगे हिची दिल्ली येथे ता. २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या आरडीसी संचलन परेडसाठी राजपथावर होणाऱ्या पंतप्रधान रॅलीसाठी ड्रिलमधून महाराष्ट्राच्या मुलीच्या संघात निवड झाली आहे.