ABD26J79521
वैजापूर : विसर्जन मार्गाची पाहणी करताना उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, पोलिस अधिकारी.
---
वैजापूरमध्ये विसर्जन मार्गाची पाहणी
-
सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून उपाययोजनांचे निर्देश
वैजापूर, ता. १६ (बातमीदार) ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पडावी, यासाठी महसूल, नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.१६) शहरातील विसर्जन मार्गाची संयुक्त पाहणी केली. मिरवणुकीच्या दिवशी होणारी गर्दी, वाहतूक नियंत्रण, अखंड वीजपुरवठा आणि नागरिकांची सुरक्षितता या अनुषंगाने विविध विभागांच्या तयारीचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.
अधिकाऱ्यांनी शहरातील महाराणा प्रताप चौक, एम. जी. रोड, टिळक रोड, जामा मशीद परिसर, शासकीय कार्यालय परिसर तसेच शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पाच्या विसर्जन स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करणे, विद्युत तारांची दुरुस्ती करून सुरक्षित वीज व्यवस्था ठेवणे आणि भाविकांसाठी आवश्यक नागरी सुविधा तत्पर ठेवण्याबाबत संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. या संयुक्त पाहणी दौऱ्यात उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जराड, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे, तहसीलदार सुनील सावंत, परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक विनय सोनावणे, गोपनीय शाखेचे ज्ञानेश्वर मेटे, महावितरणचे शहर अभियंता चेतन लिहे व उपमुख्याधिकारी अंबादास मिर्गु यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.