औरंगाबाद : गिरिजा नदीवरील पुलाची दुरुस्ती होईना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vanegaon Girija river over bridge damage during monsoon still not repaired

औरंगाबाद : गिरिजा नदीवरील पुलाची दुरुस्ती होईना

फुलंब्री : तालुक्यातील वानेगाव ते शिरोडी खुर्दला जोडला जाणारा वानेगाव येथील गिरिजा नदीवरील पूल गतवर्षी पावसाळ्यात पुरामुळे वाहून गेला होता. सदरील पुल आजही दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. हा पूल पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करुण देण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनधारकांनी केली आहे. पावसाळ्यात गिरिजा नदीला पूर आल्यास वानेगाव ते शिरोडी रस्ता बंद होणार असल्याने हजारो नागरिकांना पुलाच्या दुरुस्तीची प्रतिक्षा आहे.

तालुक्यातील वानेगाव ते शिरोडी खुर्द गावाला जोडणारा नळकांडी पूल गेल्यावर्षी गिरिजा नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला होता. शिरोडी खुर्द, तसेच वानेगावातील शेतकरी नागरीकांना वानेगावात येण्यासाठी रस्ता राहिला नव्हता. पुराचे पाणी ओसरल्यानंतर व रस्ता बंद झाल्यामुळे या विभागाच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या अनुराधा अतुल चव्हाण यांनी स्वखर्चाने मुरमाचा भराव भरून किरकोळ डागडुजी करून दिली व संबंधित विभागाकडे पूल दुरुस्तीची मागणी करण्यात आली असली तरी सदरचा वाहून गेलेला पूल आजही दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे.

गेल्यावर्षी गिरिजा नदीला आलेल्या पुरामुळे नदीलगतच्या परिसरात मोठे नुकसान झाले होते. तसेच नदीवर धुणं धुण्यासाठी गेलेल्या आजी पाठोपाठ आजीचे नातू व इतर मुलं नदीवर खेळत असताना वाहून गेलेल्या पुलाच्या बाजूला ही तीन मुलं गेली व त्या पाण्यात पडून मृत पावली होती. गिरिजा नदीवरील हा पूल तत्काळ दुरुस्त होणे अत्यंत गरजेचे आहे. शिरोडी खुर्द, शिरोडी बुद्रुक, डोंगरगाव येथील नागरीकांना फुलंब्रीला याच रस्त्याने ये - जा करावी लागते. त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वी हा पूल दुरुस्त करावा अशी मागणी या परीसरातील नागरिक तसेच वाहन धारकांनी केली आहे.

गिरिजा नदीवर असणारा हा पूल गेल्यावर्षी गिरिजा नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला. या भागातील नागरिकांच्या मागणी नुसार मी स्वत: स्वखर्चाने या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून दिली आहे. परंतु संबंधित विभागाने या रस्त्यावरील नागरिकांची गरज लक्षात घेता पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करून द्यावी.

- अनुराधा चव्हाण, माजी सभापती, महिला व बालकल्याण जि. प.औरंगाबाद.

Web Title: Vanegaon Girija River Over Bridge Damage During Monsoon Still Not Repaired

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top