ABD26J82068 (((ओव्हरसेट)))
((((फोटो ओळ))) उस्मानपुरा ः नाट्यप्रयोगाच्या सुरवातीला उपस्थित डॉ. चिन्मय बाऱ्हाळे, रमेश राजपूत, सुव्रत जोशी, सखी गोखले, सूरज पारसनीस.
---
‘वरवरचे वधू-वर’ने प्रेक्षकांना हसवले, अंतर्मुखही केले
---
‘सकाळ’ नाट्यमहोत्सवात खट्याळ, मार्मिक भाष्य आणि बहारदार सादरीकरण
....
उस्मानपुरा, ता. २५ ः घरच्यांचा लग्नासाठीचा आग्रह, करिअरची धावपळ, जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा आणि प्रेमाऐवजी व्यावहारिक गरजेतून लग्नाचा करार करण्याचा निर्णय होतो. आजच्या तरुणाईच्या आयुष्यातील या गुंतागुंतीच्या गोष्टींना विनोदाची फोडणी देत ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकाने प्रेक्षकांना खळखळून हसवले. मात्र, हास्याच्या या प्रवासात लग्नसंस्था, नात्यांमधील अपेक्षा आणि बदलती मानसिकता यावर विचार करायलाही भाग पाडले. ‘सकाळ’ नाट्यमहोत्सवानिमित्त शनिवारी (ता. २४) संत एकनाथ रंगमंदिरात सादर झालेल्या या नाटकाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
नाटकाची गोष्ट आहे मोहित माने (सुव्रत जोशी) आणि विशाखा माने (सखी गोखले) या दोन समकालीन तरुणांची. कॉर्पोरेट जगतात कामाच्या व्यापात अडकलेल्या या दोघांनाही घरच्यांच्या लग्नाच्या आग्रहाला सामोरे जावे लागते. लेखक-दिग्दर्शक विराजस कुलकर्णी यांनी आजच्या पिढीची मानसिकता, लग्नाविषयीचे बदलते विचार, करिअरची धावपळ आणि सोशल मीडियाचा प्रभाव यांची संहितेत सुरेख गुंफण केली आहे. नाटकाचे नाव ‘वरवरचे’ असले, तरी त्यातील प्रसंग नात्यांच्या खोलवर जाणाऱ्या भावविश्वाचा वेध घेतात. सूरज पारसनीस यांनीही आपल्या भूमिकेतून विनोदाची रंगत वाढवली. अपर्णा अध्यापक यांनी सूत्रसंचालन केले.
---
मान्यवरांचा सत्कार
‘सकाळ’ नाट्यमहोत्सव एक्सेल सोलार पॉवर प्रस्तुत असून, शांती नर्सिंग होमचे को-स्पॉन्सर्स म्हणून विशेष सहकार्य लाभले. यावेळी ‘सकाळ’च्या मराठवाडा आवृत्तीचे युनिट हेड संजय चिकटे यांनी सखी गोखले, सुव्रत जोशी, सूरज पारसनीस, रमेश राजपूत आणि डॉ. चिन्मय बाऱ्हाळे यांचा सत्कार केला.
...