Chh. Sambhajinagar: ‘विद्यादीप’मधील मुली पुन्हा आक्रमक;‘त्याच’ केअर टेकर हव्यात म्हणून तिघींनी हाताला कापून घेतले
Shelter Home Crisis: विद्यादीप बालगृहातील काही मुलींनी "आम्हाला इथून पाठवू नका" म्हणत आक्रमक रूप घेतले. काही मुलींनी हात कापून घेतले, तर पोलिस कर्मचाऱ्याही जखमी झाली.
छत्रपती संभाजीनगर : ‘‘आम्हाला ‘त्याच’ केअर टेकर पाहिजेत, इथून बाहेर काढू नका, आम्हाला इथेच राहायचंय’’, असा पवित्रा घेत येथील छावणी परिसरातील विद्यादीप बालगृहातील अल्पवयीन मुली शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी आक्रमक झाल्या होत्या.