Vidrohi Sahitya Sammelan : विद्रोही मराठी साहित्य संमेलनात मागणी, मांडले विविध २७ ठराव; ग्रामीण तरुणांच्या लग्नाचे पाहा जरा!
Marriage Crisis : विद्रोही मराठी साहित्य संमेलनात ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाच्या वाढत्या अडचणींवर चर्चा झाली. मुलींच्या घटत्या संख्येमुळे व शहरीकरणाच्या आकर्षणामुळे हा प्रश्न ऐरणीवर असल्याचे ठराव मांडण्यात आले.
मलिकअंबर साहित्यनगरी (छत्रपती संभाजीनगर) : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. गावात रोजगार नाही. यामुळे तरुणांची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच परंपरांमुळे मुलींची गर्भात हत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.